Why Not Olympics?

Townsol Admin

January 16, 2025

कल्पना करा, ऑलिम्पिक्स सुरू आहेत, आणि भारत स्कोअरबोर्डवर अग्रस्थानी आहे. देशाच्या प्रत्येक
कोपऱ्यातील—गावांपासून शहरांपर्यंत—लोक आपल्या टीव्ही स्क्रीनला चिकटून बसले आहेत. प्रत्येक
जिल्ह्यातून किमान एक खेळाडू ऑलिम्पिक्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. ही कल्पना स्वप्नवत
वाटते, नाही का? पण आपण सर्वजण एकत्र येऊन हे स्वप्न सत्यात उतरवू शकतो.
एक प्रश्न: का?
भारत, १४० कोटी लोकांचा देश, मात्र मागील ऑलिम्पिक्समध्ये एकही सुवर्णपदक जिंकू शकला नाही.
का? विचार करा.
आपल्याकडे टॅलेंटची कमतरता मुळीच नाही. पण, मला वाटतं unified sports culture ची उणीव आहे.
असो, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरिता आपण सगळ्यांनी मिळून “व्हाय नॉट ऑलिम्पिक्स?” हे मिशन
हातात घेऊया
ह्या प्रश्नाचे काही महत्वाचे पैलू

  1. काही तालुक्यामध्ये क्रीडा उपक्रम मर्यादित आहेत किंवा जवळपास नाहीतच.
  2. फक्त काही मोजक्याच गावांतील शाळांमध्ये सर्व प्रकारच्या खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा
    आणि क्रीडा संस्कृती आहे.
  3. अनेक गावांमध्ये खेळाचे मैदानसुद्धा नाही.
  4. होतकरू खेळाडू साधनांच्या किंवा प्रेरणेच्या अभावामुळे खेळ सोडून देतात.
  5. कोणत्याही खेळाला प्रोत्साहन देण्याकरिता पोषक सामाजिक वातावरण नाही
    सुविधांचा अभाव, योग्य मार्गदर्शन किंवा संधी मिळत नसल्यामुळे, गावागावातील टॅलेंट मागे रहातं
    कदाचित एखादं सुवर्णपदक एका छोट्या गावात दडलेलं असू शकतं? .म्हणूनच हि दडलेली ताकत आपण
    शोधून काढून भारताला खेळात सामर्थ्यशाली करूया
    टाऊनसोल—एक नवीन प्रवासाची सुरुवात
    आपलं मिशन म्हणजे क्रीडेला समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवायचं—जसं की टीव्ही
    पाहणं. चला तर मग गावांमध्ये जाऊन भविष्यातील ऑलिम्पियन्सना प्रेरित करूया आणि त्यांचं टॅलेंट
    विकसित करूया.
    आपलं उद्दिष्ट:
  6. योग्य खेळ ओळखणं: प्रत्येक गावाच्या संस्कृतीनुसार आणि स्थानिक टॅलेंटनुसार योग्य खेळ ओळखून
    त्यांना प्रोत्साहन देणं.
  7. प्रेरणा निर्माण करणं: तरुण मुलं-मुलींमध्ये खेळांची आवड निर्माण करून त्यांना प्रेरित करणं.
  8. पायाभूत सुविधा निर्माण करणं: शाळा, महाविद्यालयं, स्थानिक संस्था आणि सरकारी योजनांच्या
    सहकार्याने क्रीडासंबंधित सुविधा उपलब्ध करणं.
    आपण हे कसं साध्य करू शकतो ?
  9. सांघिक प्रयत्न:
    आपल्या जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर कोणते खेळ प्रभावीपणे खेळले जाऊ शकतात, तसेच अपरिचित
    खेळ सुद्धा कसे विकसित होतील ह्यावर टाऊनसोलच्या मंचावर सविस्तर चर्चा करूया
  10. सरकारी योजनांचा उपयोग:
    ‘खेलो इंडिया’सारख्या कार्यक्रमांची माहिती आणि इतर शासकीय व अशासकीय योजना प्रत्येक होतकरू
    खेळाडूपर्यंत पोहोचवूया.
  11. पायाभूत सुविधा:
    मैदानं, प्रशिक्षण केंद्रं यांची उभारणी जिथं सध्या या सुविधा नाहीत, तिथं प्राधान्यानं करूया.
  12. शाळांना सक्षम करणं:
    शाळांना क्रीडेला मुख्य शिक्षणाचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहन देऊ.
    भविष्यातील स्वप्न:
    ● प्रत्येक शाळा आणि कॉलेज सगळ्या क्रीडा प्रकारामध्ये सक्रिय असतील
    ● प्रत्येक गावात स्थानिक क्रीडा संघ प्रत्येक खेळाकरिता होतील कि जेणेकरून क्रीडा स्पर्धाची
    वातावरण निर्मिती होईल
    ● अशा प्रकारे प्रत्येक खेळाडूला तालुका आणि जिल्हा पातळीवर एक हक्काचे व्यासपीठ मिळेल कि
    जिथे प्रत्येक खेळाडू आपल्या आवडी आणि कुवतीनुसार खेळाचे प्रदर्शन करतील
    ● क्रीडा ही फक्त एक प्रक्रिया न राहता, प्रत्येक गावाची जीवनशैली बनेल म्हणजे प्रत्येक खेळाला
    स्थानिक हक्काचे प्रेक्षक मिळतील
    तुमची भूमिका:
    मित्रांनो, आपल्या पुढच्या सुवर्णपदक विजेत्याला प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी
    तुम्ही तयार आहात का?
    चला, टाऊनसोलच्या चौफेर विचारमंथनात सामील व्हा आणि आपले विचार, मार्गदर्शन,सूचना, कल्पना,
    ज्ञान,अनुभव तसेच ह्या मिशन करीता तुमच्याकडे जे काही सांगण्यासारखे असेल ते इथे मांडूया आणि
    सर्वांच्या सहकार्याने ह्या स्वप्नाला एक सत्याचे रूप देऊया
    टाऊनसोल.org वर रजिस्ट्रेशन करा, चर्चा करा, आणि कृतीसाठी पुढे या. एकत्र येऊन मोठं स्वप्न साकार
    करूया.
    Mission “Why Not Olympics ?

District Vision
Partner