भारतीय अनिवासी महिलांना आमचे गाऱ्हाणे 

Townsol Admin

April 28, 2025

आपल्या समाजाची रचना अजूनही बऱ्याच अंशी पुरुषप्रधान आहे, म्हणजेच कुटूंबातील अनेक निर्णय, जबाबदाऱ्या आणि संधींवर पुरुषांचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत महिलांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो – मग ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय किंवा स्वतःचे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा विषय असो.

विशेषतः तालुकास्तरावर व ग्रामीण भागात हे चित्र अधिक ठळकपणे दिसते. येथे महिलांवर घर सांभाळण्याची, मुलांची काळजी घेण्याची, वृद्धांची सेवा करण्याची जबाबदारी असते. तरीसुद्धा ज्या महिलांकडे कौशल्य आणि कुवत असते त्यांना घराच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून उत्पन्न मिळवण्याचं उच्च असते पण बऱ्याच वेळेला ह्या पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्तेत किंवा इतर काही कारणामुळे ते शक्य होत नाही याचा यामध्येच त्यांचा संपूर्ण वेळ जातो. त्यात बाहेर जाऊन काम करण्यासाठी पुरेसे साधन, संधी किंवा कुटुंबाची परवानगी मिळत नाही.

याच कारणामुळे अनेक महिला अशा व्यवसायाच्या किंवा कामाच्या शोधात आहेत जे त्या घरबसल्या करू शकतील – म्हणजे घराच्या जबाबदाऱ्या सांभाळूनच थोडं उत्पन्न मिळवू शकतील. हे उत्पन्न त्यांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करत नाही, तर स्वाभिमान, आत्मविश्वास आणि समाजात आपली ओळख निर्माण करण्यास मदत करतं.

मी इचलकरंजी या तालुक्याच्या ठिकाणाहून आहे. या भागात राहून मी महिलांना प्रत्यक्ष पाहिलं आहे की त्यांना घरबसल्या उत्पन्न कमवण्याची खूप गरज आहे. अनेक महिला कुशल आहेत, मेहनती आहेत, आणि घरखर्चाला हातभार लावण्याची त्यांची इच्छा आहे. मात्र त्यांच्याकडे ना योग्य माहिती आहे, ना संधी, आणि ना मार्गदर्शन – म्हणून त्यांच्या कौशल्याचा उपयोग होऊ शकत नाही.

या गरजा मी माझ्या आजूबाजूला नेहमी पाहिल्या आहेत – काही वेळा घरातला पुरेसा खर्च भागवण्यासाठी, तर काही वेळा स्वतःच्या आत्मनिर्भरतेसाठी त्या संधी शोधत असतात. त्यामुळे ही समस्या मला वैयक्तिक पातळीवरही स्पर्श करते. म्हणूनच मला वाटलं की ही कल्पना मी तुमच्यासमोर ठेवावी – आपण सगळ्यांनी मिळून या महिलांना घरबसल्या करता येणाऱ्या उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काहीतरी करायला हवं.

सध्या बरेच महिला बचत गट आणि NGOs कार्यरत आहेत कि जिथे अशा महिलांना कामाची संधी मिळते मग तुम्हाला अशा काही बचत गट मधये यशःवी झालेले प्रॉडक्ट परंतु मागणी पुरी करता येत नाही तर अशा प्रकारची माहिती इथे द्या म्हणजे दुसऱ्या तालुक्यातील महिलांना द्या संधीचा फायदा घेऊ शकतील

त्याच बरोबर परदेशात (उदा. अमेरिका, युके, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया इ.) राहणाऱ्या महिलांचे अनुभव पण खूप महत्वाचे आहेत. कारण स्थायिक झालेल्या किंवा कामानिमित्ताने राहणाऱ्या अनेक मराठी महिलांनी त्यांच्या स्थानिक परिसरातील गरजा, बाजारपेठेचे ट्रेंड्स आणि संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून विविध प्रकारचे कुटीर उद्योग किंवा लघुउद्योग उभे केले आहेत. उदाहरण घायच तर जसे की: सुगंधी मेणबत्त्या, नैसर्गिक साबण, लिप बाम, स्किन केअर उत्पादनं किंवा महाराष्ट्रीयन मसाल्यांचे फ्यूजन पदार्थ, कोल्हापुरी चटणी, बेक केलेले मोदक व लोककलांवर आधारित home décor किंवा utility वस्तू अशा प्रकारचे उद्योग त्याची उभे केले आहेत.

त्यामुळे हे अनुभव भारतातील महिलांसाठी कसे उपयुत ठरतील ते बघा.

परदेशात राहणाऱ्या महिलांना स्थानिक ग्राहकांच्या गरजा, उत्पादक तंत्रज्ञान, ऑनलाईन विक्री पद्धती, सोशल मीडिया मार्केटिंग याचे चांगले ज्ञान मिळालेले असते. त्या त्यांचे यशाचे अनुभव, शिकलेले धडे, कोणते उत्पादन चालतात, कुठे मार्केट आहे, कसे ब्रँडिंग करावे, कसा ग्राहकांपर्यंत पोहोचावे — याबाबत जर माहिती शेअर करतील, तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांना नवीन संधी शोधण्यासाठी आणि त्यात उतरून व्यवसाय उभा करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

आणि त्याच बरोबर होणारे फायदे पुढील प्रमाणे

१. परदेशातील महिलांचे अनुभव भारतीय महिलांना पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन विचार करायला लावतात.

२. त्यांच्या माहितीमुळे ग्रामीण महिलांना ग्लोबल ग्राहकांचे ट्रेंड्स समजतील.

३. ई-कॉमर्स, सोशल मीडिया मार्केटिंग यासारख्या आधुनिक विक्री मार्गांची माहिती मिळेल.

४. घरबसल्या महिलांना उद्योग सुरू करून स्वतःचा आर्थिक पाया मजबूत करता येईल.

परदेशात राहणाऱ्या मराठी महिलांचे अनुभव म्हणजे भारतातील महिलांसाठी एका नव्या दिशेचा आणि प्रेरणेचा मार्ग आहे. अशा अनुभवांना TownSol या प्लॅटफॉर्मवर एकत्र करून शेअर केल्यास, अनेक ग्रामीण आणि निमशहरी भागांतील महिलांना नवीन विचार, नवे व्यवसाय, आणि नवी स्वप्नं मिळू शकतात.

यासाठी आपण सांगळे एकत्र येऊया TownSol.org या प्लॅटफॉर्मर वर आणि चर्चा करूया आणि अशा प्रकारच्या परदेशातील विविध संधीची इथे यादी करूया.

District Vision
Partner